Label

आमच्याविषयी

विभागाबद्दल

म.रा.उर्दू सा.अकादमी/का-5/अ.वि.वि.

दि. 16/04/1975 च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, मुंबई ची स्थापना करण्यात आलेली असून सदर शासन निर्णयात महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या स्थापनेची उद्दिष्टे नमूद करण्यात आलेली आहेत. सदर उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी तसेच, उर्दू भाषेच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत विविध योजना राबविण्यात येतात. सदर अकादमीची उद्दिष्टे व अकादमीमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेऊन त्यात आवश्यकतेनुसार सुधारण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीची उद्दिष्टे सदर अकादमीमार्फत उर्दू भाषेच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या विविध योजनासंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले सर्व शासन निर्णय/आदेश/परिपत्रक अधिक्रमित करुन महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीची पुढील नमूद उद्दिष्टे निश्चित करण्याचा व महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत पुढील योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीची उद्दिष्टे :- महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहे.

  1. इम्कान त्रैमासिकाचे प्रकाशन,
  2. राज्य्‍ व जिल्हा स्तरावर चर्चासत्रे,
  3. उर्दू महेफिले, मुशायरा आदीचे आयोजन करणे,
  4. उर्दू शाळा व महाविद्यालयांना वाड:मयीन कार्यक्रम आयेाजित करण्यासाठी सहाय्य्क अनुदान मंजूर करणे.
  5. उर्दू ग्रंथालयांना व ज्या ग्रंथालयांमध्ये उर्दू भाषेची पुस्तके ठेवण्यात येतात अशा ग्रंथालयांना नियतकालिके व पुस्तकांच्या स्वरुपात सहाय्य्क अनुदान मंजूर करणे.
  6. उर्दू नाटय/एकांकिका महोत्स्व आयोजित करणे.
  7. नाटय कार्यशाळेचे आयोजन करणे.
  8. नाटय एकांकिका लेखकास उत्तेजन देण्याच्या दृष्टीने पारितोषिक देणे.
  9. उर्दू पुस्तकांना तसचे मराठी-उर्दू अनुवादनाच्या पुस्तकांना प्रकाशनासाठी आर्थिक मदत करणे.
  10. उर्दू पुस्तकासाठी पारितोषिके देणे.
  11. 10 वी, 12 वी, पदवी व पदव्युत्त्र परीक्षांमध्ये उर्दू विषयात तसेच उर्दू माध्यमात पहिल्या, दुस-या व तिस-या क्रमांकाचे गुण प्राप्त्‍ करणा-या विद्यार्थ्यांना पारितोषिक देणे.
  12. शासन मान्य्‍ उर्दू ग्रंथालयांना तसेच, सर्वसाधारण स्वरुपाच्या ज्या शासन मान्य्‍ ग्रंथालयांमध्ये उर्दू शाखा अस्तित्वात आहेत. अशा ग्रंथालयांना उर्दू पुस्तके/नियतकालिके उपलब्ध करुन देणे.
  13. उर्दू पत्रकारांसाठी दरवर्षी कार्यशाळाचे आयोजन करणे.
  14. उर्दू भाषा शिकण्याची इच्छा असणा-या लोकांसाठी उर्दू वर्ग सुरु करणे.