सर्वसाधारण नियमानुसार, हे पोर्टल तुमच्याकडून (जसे की, नाव, दूरध्वनी क्रमांक किंवा ई-टपालाचा पत्ता) अशी कोणतीही विनिर्दिष्ट वैयक्तिक माहिती आपोआप ग्रहण करू शकत नाही, ज्याद्वारे तुमची स्वतंत्रपणे ओळख पटविण्याची आम्हाला मुभा मिळू शकेल. हे पोर्टल तुमच्या भेटीचा अभिलेख ठेवते आणि सांख्यिकी प्रयोजनासाठी पुढील माहितीची जसे की, आंतरजाल नियमावली (आयपी) पत्ते, अधिक्षेत्राचे नाव, ब्राऊझरचा प्रकार, कार्यप्रणाली, भेट दिल्याची तारीख व वेळ आणि भेट दिलेली पृष्ठे यांची नोंद करते. या स्थळाला हानी पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा तपास लागेपर्यंत आमच्या स्थळाला भेट देणाऱ्यांची स्वतंत्रपणे ओळख पटविण्यासाठी या पत्त्यांशी संधान साधण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नाही. कायदे अंमलबजावणी अभिकरणाचा सेवा प्रदात्याच्या नोंदी तपासण्याबाबतचा लेखी आदेश असल्याशिवाय, वापरकर्त्याची किंवा त्याच्या ब्राऊझिंग क्रियांची ओळख आम्ही पटविणार नाही.अल्पसंख्याक विभाग संकेतस्थळाने तुमच्याकडे वैयक्तिक माहिती पुरविण्याची विनंती केल्यास आणि तुम्ही ती देणे पसंत केल्यास ते कसे वापरावे याची माहिती तुम्हाला दिली जाईल आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी सुरक्षा प्रमाणके आचरली जातील.